भारतीय राजकारणातील एक मूलभूत चूक
अनेक अवयवांना एकत्र जोडून शरीराची निर्मिती होत नसते, तर एका शरीराचे अनेक अवयव असतात. म्हणूनच प्रत्येक अवयव स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वासाठी नव्हे, तर शरीराच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करतो... संप्रदाय, प्रांत, भाषा, वर्ग इत्यादींचे महत्त्व तोपर्यंतच असते की, जोपर्यंत ते सारे राष्ट्रहिताला अनुकूल असतात आणि तसे ते अनुकूल नसतील तर त्यांचे बलिदान देऊनही राष्ट्राच्या एकतेचे रक्षण केले पाहिजे.......